loader
Breaking News
Breaking News
Foto

31 डिसेंबर व नवीन वर्ष आगमन निमित्ताने पनवेल तालुका पोलीसांच्या मार्फत हद्दीतील फार्म हाऊस रिसॉर्ट चालक मालक यांना महत्वाच्या सूचना

पनवेल :- 31 डिसेंबर व नवीन वर्ष आगमन निमित्ताने पनवेल तालुका पोलीसांच्या मार्फत हद्दीतील फार्म हाऊस रिसॉर्ट चालक मालक यांना महत्वाच्या सूचना अनुषंगाने बैठक घेऊन देण्यात आल्या. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील फार्म हाऊस रिसॉर्ट चालक मालक यांची 31 डिसेंबर व नवीन वर्ष आगमन निमित्ताने कार्यक्रमाचे अनुषंगाने बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना करताना सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरे अद्यावत करणे, अमली पदार्थ वापर होणार नाही याची दक्षता घेणे,स्पीकर परवानगी घेणे व विहित वेळेत स्पीकर बंद करणे,फार्म हाऊस रिसॉर्ट येथे क्षमता असेल तेवढीच बुकिंग करणे, अग्निशमन किट/फायर वाटला ठेवणे,फार्म हाऊस रिसॉर्ट येथे काम करणारे कामगारांचे व्हेरिफिकेशन करून घेणे,सेक्युरिटी गार्ड नेमणे, स्विमिंग पूल असल्यास तेथे प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही त्याकरिता पार्किंग व्यवस्था करणे. आदी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सदर बैठकीस 30 फार्म हाऊस रिसॉर्ट चालक-मालक हजर होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg