loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था, मुंबई आयोजित दादासाहेब सरफरे १६ वा कला-क्रीडा महोत्सव २०२५ ची जल्लोषपुर्ण वातावरणात सांगता

संगमेश्वर (प्रतिनिधी) : बुरंबी (संगमेश्वर) येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई आयोजित तीन दिवसीय १६ वा कला क्रीडा महोत्सव व विद्यर्थी गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक १८ रोजी प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमामध्ये दुस-या दिवशी १७ वर्षे मुलगे रस्सी खेच (सांधिक) स्पर्धेत दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी प्रथम, न्यू इंग्लिश स्कुल कसबा द्वितीय तर शिवाजी विद्यालय कोसुंब तृतीय, १७ वर्षे मुली खो-खो (सांधिक) कुमारी प्राजक्ता अदवळ, न्यू इ. स्कुल देवरुख सर्वोत्कृष्ट खेळाडू, न्यू इ. स्कुल देवरुख प्रथम, दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, द्वितीय तर माध्यमिक विद्यालय सोनवडे तृतीय, १७ वर्षे मुलगे कबड्डी सांघिक स्पर्धेमध्ये अनिष पांचाळ, माध्यमिक विद्यालय ताम्हाने सर्वोत्कृष्ठ खेळाडू, माध्यमिक विद्यालय ताम्हाने प्रथम, शिवाजी विद्यालय कोसुंब द्वितीय, तर डॉ. गार्डी स्कुल कळंबस्ते तृतीय, १०० मीटर धावणे १७ वर्षे मुलगे (वैयक्तिक) क्रीडा स्पर्धेत आदर्श मंगेश भुवड (फुणगुस हायस्कुल) प्रथम, आयुष अनंत घाग, माध्यमिक विद्यालय सोनवडे द्वितीय तर तन्मय अशोक धामने, शिवाजी विद्यालय कोसुंब, तृतीय, १०० मीटर धावणे १७ वर्षे मुली (वैयक्तिक) क्रीडा प्रकारात सिद्धी रमेश सुवरे, माध्यमिक विद्यालय सोनवडे प्रथम, अनाममिका मारुती परशुराम, न्यु इं. स्कु. देवरुख, द्वितीय, तर जान्हवी अशोक परसुराम, देवरुख तृतीय १७ वर्षे मुलगे लांब उडी (वैयक्तिक) पारस साळवी कसबा मराठी माध्यम, प्रथम, वेदांत मंगेश पातेरे, शिवाजी विद्यालय कोसुंब द्वितीय तर रुद्राक्ष वडपकर, दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी तृतीय तसेच १७ वर्षे मुली लांब उडी (वैयक्तिक) क्रीडा प्रकारात तन्वी दत्ताराम गोनबरे, कुरधुंडा विद्यालय प्रथम, अस्मी मिलिंद काष्टे, दादासाहेब सरफरे वि. बुरंबी द्वितीय, तर देवयानी सचिन गेल्ये, दादासाहेब सरफरे वि. बुरंबी तृतीय व १७ वर्षे मुली तिहेरी उडी स्पर्धेत तन्वी दत्ताराम गोनबरे, कुरधुंडा विद्यालय प्रथम, अस्मी मिलिंद काष्टे, दादासाहेब सरफरे वि. बुरंबी द्वितीय तर भक्ती दीपक जवळ, कुरधुंडा विद्यालय तृतीय क्रमांकाने विजयी ठरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तर तिस-या दिवशी १७ वर्षे वयोगट हॉलीबॉल सांघिक स्पर्धेत यश पड्याळ. माध्यमिक विद्यालय ताम्हाने सर्वोत्कृष्ठ खेळाडू, माध्यमिक विद्यालय ताम्हाने प्रथम, आश्रम शाळा निवे द्वितीय, लोकविद्यालय तुळसणी तृतीय, विजयी संघ विजयी ठरले. विजयी संघ व स्पर्धकांचे संगमेश्वर येथील प्रतिष्ठीत उद्योजक दादा सैतवडेकर, प्रमोद अधटराव, मुंबईस्थीत उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शंकरशेठ माटे, गंगाराम टोपरे, संस्था अध्यक्ष दिलिप रावजी मोरे, उपाध्यक्ष विक्रांत यशवंत जाधव, सरचिटणीस शरद गोविंद बाईत, शांताराम जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, शाळा समिती अध्यक्ष दिनेश शामराव जाधव, संचालक शांताराम जाधव सचिब ललितकुमार लोटणकर, प्राचार्य प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महावीर साठे यांच्या शुभहस्ते चषक, प्रमाणपत्र बुके व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शंकरशेठ माटे यांनी शाळेची प्रगती व संस्थेने उपलब्ध करुन दिलेल्या भौतिक सुविधा यामुळे बुरंबी पंचक्रोशीचे हे शिक्षण संकुल पाहुन समाधान व्यक्त केले. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांचा अथोचित सत्कार करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

महोत्सवाचाच भाग म्हणून संपन्ना पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माध्यमिक विभाग व कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यानी पारंपारीक जाखडी नृत्ये, रेकॉर्ड डान्स, विनोदी नाटीका, पोवाडा, महाराष्ट्राची लोकधारा व सण, लावणी, गोंधळ सादर केला. यावेळी राज्यस्तरावर प्राविण्य व कथाकथन स्पर्धेतील गौरव झालेला प्रशालेचे कला शिक्षक प्रदीप शिवगण यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून विद्यार्थ्यानी सादर केलेला "हनुमान - सिता भेट" कथीकेने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी सर्वांचीच वाहवा मिळविली. तर विद्यर्थ्यानी सादर केलेल्या "हिमालयाच्या पटकीस गावलो राजपुत्र" लघु विनोदी नाट्याने पुर्ण प्रेक्षक वर्गने भरभरुन दाद दिली.. यावेळी कला मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंदी निबंध व काव्यलेखन स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त प्रशालेतील शिक्षक सुहास गेल्ये, कला स्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले कला शिक्षक प्रदीप शिवगण तसेच राज्यात पंच म्हणून कामगिरी केलेले सहाय्यक शिक्षक सुहास पाब्ये त्याचप्रमाणे कला उत्सव स्पर्धेत राज्यात द्वीतीय आलेली इ.१० वीतील आकांक्षा योगेश सप्रे, किर्ती प्रसाद देवस्थळी, राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेला ओंकार दत्ताराम रामाणे, रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघ (कर्णधार, राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेला अथर्व महादेव गेल्ये, चित्रकला एलिमेंटरी (राज्यात गुणवत्ता यादीत ५४ वा आलेला श्लोक शशिकांत घडशी, भारती विद्यापीठ इंग्रजी विषयात राज्यात प्रथम आलेली ईश्वरी सुनिल सुवरे तर कवड्डी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आयुष राजाराम माचिवले यांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व संचालक व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg