loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने संपर्क अभियान

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने रत्नागिरी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी तेली समाजाची वस्ती आहे, त्या त्या ठिकाणी संपर्क अभियानाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट देऊन समाज बंधुभगिनींशी संवाद साधण्यात येत आहे. त्या अनुषंगाने बालाजी मंगल कार्यालय नाचणे ता.जिल्हा रत्नागिरी येथे नाचणे, श्रीराम नगर, संभाजी नगर, विनम्र नगर, समर्थ नगर, शांतीनगर, साई नगर, गुरुमळी, नारायण मळी, आंबेशेत येथील तेली समाज बंधुभगिनींची बैठक आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर यांनी तालुक्या मार्फत राबविण्यात येत असलेले विविध उपक्रम, आजच्या बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा अध्यक्ष रघुविर शेलार यांनी आजच्या बैठकीचा उद्देश, संघटनेची स्थापनेपासून ती सध्याची वाटचाल, पतसंस्थेची निर्मितीपासून आजची स्थिती, रत्नागिरी शहराच्या जवळच उभारण्यात येत असलेले तेली समाजासाठी स्वाभिमानाचे प्रतिक असलेले तेली समाज भवन आणि आणि त्याकरता प्रत्येक बांधवांचे योगदान कसे आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन केले. या बैठकीला जिल्हा सचिव संदीप पवार, जिल्हा सदस्य मकरंद पावसकर, जेष्ठ मार्गदर्शक नारायण झगडे, तालुका सचिव रुपेश शेलार, पतपेढीचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक भाऊ नाचणकर, सेवा आघाडीचे काशिनाथ सकपाळ आवर्जून उपस्थित होते. या बैठकीमध्ये श्रीकृष्ण रहाटे, रुपेश शेलार, दत्ताराम आंब्रे इत्यादींनी चर्चेत सहभागी होत चांगला संवाद घडवून आणला.

टाइम्स स्पेशल

बैठक यशस्वी करण्यासाठी सुनिल झगडे, सुनिल राऊत, विजय चव्हाण, वैभव कदम, महेश रहाटे, सुर्यकांत नाचणकर, मनोज नाचणकर, प्रकाश बाळ रहाटे, प्रकाश रघुनाथ रहाटे, दिनकर नाचणकर, अमोल गोपाळ झगडे, सुहास चव्हाण, प्रसन्न तेली, दुर्वांकुर, झगडे, अविनाशपावसकर, गणेश नाचणकर, गौरेश नेवरेकर, दिपक लांजेकर इत्यादी सर्वच तेली समाज बांधवांनी अतिशय चांगली मेहनत घेतली. शेवटी सभेसाठी जागा व आजची व्यवस्था उपलब्ध करून देणारे अशोक (भाऊ) नाचणकर यांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानून बैठक समाप्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg