loader
Breaking News
Breaking News
Foto

कोलगाव कुंभारवाडीतील धोकादायक मार्गामुळे अपघाताची भीती

सावंतवाडी : तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थांना आणि शालेय विद्यार्थ्यांना आजही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झिरंग ७ नंबर शाळा, बाजारपेठ आणि शहरात जाण्यासाठी येथील नागरिक नाल्यावरील केवळ तीन सिमेंटच्या खांबांचा आधार घेत आहेत. मात्र, यातील एक खांब आता पूर्णपणे मोडकळीस आला याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुंभारवाडीतून शहरात येण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. मात्र, मध्यभागी मोठा नाला असल्याने पावसाळ्यात या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भीषण असते. केवळ तीन सिमेंटच्या पोलवरून विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना ये-जा करावी लागते. अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे ही वाट निसरडी झाली असून आधारासाठी साधे रेलिंगही उपलब्ध नाही. त्यामुळे चालताना पाय घसरून थेट नाल्यात पडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg