loader
Breaking News
Breaking News
Foto

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात छत्रपती संभाजी महाराज ३६९ वी जयंती साजरी

रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी’ येथे दिनांक १४ मे रोजी धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ३६९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १४ मे २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात केंद्रातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार प्रदान करून आणि उपस्थितांकडून पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. केतन चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराज कार्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना डॉ. केतनकुमार चौधरी यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासाची माहिती दिली. ते म्हणाले की, "शंभूराजे हे केवळ एक महान योद्धाच नव्हते, तर ते अत्यंत विद्वान आणि बहुभाषाकोविद होते. त्यांचा त्याग आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आजही आपल्याला प्रेरणा देते." ते संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी 'बुधभूषण', 'नायिकाभेद', 'सातसतक' यांसारख्या ग्रंथांची निर्मिती केली.

टाईम्स स्पेशल

शंभूराजांनी आपल्या ९ वर्षांच्या कारकिर्दीत १२० हून अधिक लढाया लढल्या आणि एकाही लढाईत त्यांचा पराभव झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी मुघल, पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी अशा सर्व शत्रूंना एकाच वेळी समर्थपणे तोंड दिले. स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमामुळे केंद्रातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव रत्नागिरी येथील डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, डॉ. मनोज घुघुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, अपूर्वा सावंत आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg