संगलट (खेड) (प्रतिनिधी) -निसर्ग संवर्धनासाठी अनेक संस्था आणि व्यक्ती विविध उपक्रम राबवत असतात. मात्र, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांना पर्यावरणाप्रती जागरूक करण्यासाठी कधीकधी कल्पकतेचा आधार घ्यावा लागतो. सध्या अशाच एका अनोख्या फलकाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एका नुकत्याच लावलेल्या लहान झाडाच्या संरक्षकावर एक छोटा फलक लावण्यात आला आहे. त्यावर मराठीत अतिशय मार्मिक संदेश लिहिण्यात आला आहे: "या झाडाला रोज पाणी घातल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात." सहसा लोक आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून देवदर्शनाला जातात किंवा विविध धार्मिक विधी करतात. मात्र, या उपक्रमाने मानवी श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांची सुरेख सांगड घातली आहे. "जर एखादी व्यक्ती या फलकाकडे पाहून श्रद्धेपोटी का होईना त्या झाडाला पाणी घालत असेल, तर त्यामुळे एका जीवाला जीवदान मिळणार आहे," अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
टाइम्स स्पेशल
इंधन बचतीसाठी म्हसळा तहसीलदार सचिन खाडे सायकलस्वार
























































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.