बांदा (प्रतिनिधी) - सातोसे येथील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानच्यावतीने गुरुवारी १४ व शुक्रवार १५ मे रोजी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात विविध पूजाविधी, आरत्या, भजने तसेच पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी १४ रोजी सकाळी ९ वाजता अभिषेक, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७.३० वाजता श्री बोर्डेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. शुक्रवारी १५ रोजी सकाळी ८ वाजता लघुरुद्र, दुपारी 12 वा. महाआरती व तीर्थप्रसाद, तसेच दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वा. स्थानिक भजने, ५ वा. महिलांचा फुगडी कार्यक्रम, ७ वा. दिवजोत्सवसह पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १० वा. बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार नाट्यमंडळ, कवठी-कुडाळ यांचा दणदणीत नाट्यप्रयोग रंगणार आहे. या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, सातोसे ग्रामस्थ व श्री देवी ग्रामोत्कर्ष समिती मुंबईच्यावतीने करण्यात आले आहे.
सामाजिक
डोंगरपाल येथे माऊली पंचायतन पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात






















































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.