loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा-राजापूर युवासेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी लक्ष्मण कदम यांची निवड

देवळे (प्रकाश चाळके) - लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या युवासेना क्षेत्रप्रमुखपदी लक्ष्मण कदम यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार किरण सामंत यांनी लक्ष्मण कदम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघटन वाढीसाठी तसेच युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी लक्ष्मण कदम प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.लक्ष्मण कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व संघटनात्मक कामात सक्रिय असून युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांच्या निवडीमुळे लांजा-राजापूर मतदारसंघातील युवासेनेला नवचैतन्य मिळणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.या निवडीबद्दल विविध स्तरांतून लक्ष्मण कदम यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लक्ष्मण कदम हे आमदार किरण सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. यावेळी शिवसेना , युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg