विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून आमदारकीची शपथ घेतली. विधान परिषदेच्या एकूण १० जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. १२ मे २०२६ रोजी मतदान होणार होते, मात्र १० जागांसाठी केवळ १० उमेदवारांचेच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांच्या वाट्याला सर्वाधिक ६ जागा आल्या, तर शिंदे गटाने २ आणि अजित पवार गट व ठाकरे गटाला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.
भारतीय जनता पार्टी (भाजप): प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव (पोटनिवडणूक), शिवसेना (एकनाथ शिंदे गट): डॉ. नीलम गोऱ्ह आणि बच्चू कडू. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट): अंबादास दानवे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): झिशान सिद्दिकी.























































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.