loader
Breaking News
Breaking News
Foto

इंधन बचतीसाठी म्हसळा तहसीलदार सचिन खाडे सायकलस्वार

म्हसळा, रायगड : आखाती राष्ट्रांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर त्याचे परिणाम होत असून देशात इंधन टंचाई व पर्यावरणीय समस्या अधिक गंभीर बनत आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या विधायक आवाहनाला प्रतिसाद देत म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांनी स्वतः सायकलचा वापर करून नागरिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. दि.१४ मे रोजी तहसीलदार सचिन खाडे यांनी त्यांच्या निवासस्थानापासून तहसील कार्यालयापर्यंतचा एक किलोमीटर प्रवास शासकीय वाहनाऐवजी सायकलवरून केला. त्यांच्या या उपक्रमाचे शहरातील नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी तहसीलदार खाडे यांनी सांगताना “देशाचे पंतप्रधानांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला मी स्वतःपासून सुरुवात करून प्रतिसाद दिला आहे. केवळ इंधन बचतच नव्हे तर पर्यावरण संवर्धनासाठीही प्रत्येकाने छोट्या अंतरासाठी सायकलचा वापर करणे आवश्यक आहे.”तसेच त्यांनी आपल्या घरातील साधेपणाचाही उल्लेख करत त्यांच्या मातोश्री अजूनही चुलीवर स्वयंपाक करतात. गॅसचा अत्यल्प वापर करतात. आमच्या घरी एका गॅस सिलेंडरचा तब्बल चार महिने वापर होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

टाईम्स स्पेशल

जर प्रत्येक नागरिकाने जवळच्या प्रवासासाठी सायकलचा वापर केला तर इंधन बचतीबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल. शिवाय शरीर सुदृढ व तंदुरुस्त राहण्यासही याचा फायदा होईल, असे आवाहन तहसीलदार खाडे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg