loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा येथे आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) - खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, बांदा येथील भव्य पटांगणावर धी. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित दहा शाळांमधील विद्यार्थ्यांचा आंतरशालेय क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दरवर्षी या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या महोत्सवाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहणाने झाले. बांदा हायस्कूलच्या एनसीसी कॅडेट्सनी आकर्षक संचलन करत क्रीडा ध्वज व व्यासपीठावरील मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी बांदा, भेडशी, कुडासे, मडुरा, पिकुळे, डेगवे, कोलझर, असनीये व आयी येथील सहभागी शाळांच्या खेळाडूंनीही मानवंदना दिली. राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावणारे भावेश गवस व सानिया म्हसकर या गुणवंत खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून मैदानात प्रदक्षिणा घातली. यानंतर खेमराज शाळेच्या विद्यार्थ्यांनी रंगारंग उद्घाटन कार्यक्रम सादर केला. या निमित्ताने शैक्षणिक वर्षात राज्यस्तरावर यश संपादन करणारे रावी देसाई व सुचित्रा गोंधळी (सॉफ्टबॉल), अलीशा गावडे (हँडबॉल), भावेश गवस (किक बॉक्सिंग), सानिया म्हसकर (भालाफेक), प्रेरणा भोसले (बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, कराटे) तसेच आयुष वालावलकर (थाळी फेक/गोळा फेक) या विद्यार्थ्यांचा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची प्रस्तावना समन्वय समितीचे सहसचिव नंदकुमार नाईक यांनी केली. विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यातही असे उपक्रम राबविले जातील, असे त्यांनी सांगितले. समन्वय समिती सदस्य अन्वर खान यांनी मुलांची मैदानी खेळातील रुची कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून अशा स्पर्धांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बांदा दशक्रोशीला वैद्यकीय सेवा देणारे माजी विद्यार्थी डॉ. दिलीप सावंत, डॉ. तुषार कासकर व डॉ. नारायण नाईक यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. दिलीप सावंत यांनी मैदानी खेळ विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन केले. संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर यांनी संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शिक्षणासोबत क्रीडा सुविधांसाठीही प्रयत्न सुरू राहतील, असे स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाला शालेय समन्वय समिती सचिव रश्मी तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, सदस्य अन्वर खान, सुनीता नाईक, मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रश्मी नाईक व रसिका भिसे यांनी केले, तर आभार प्रमोद सावंत यांनी मानले. क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या उपस्थितीत झाला. क्रीडा अहवालाचे वाचन सूर्यकांत सांगेलकर यांनी केले. महोत्सवाची सांगता ‘वंदे मातरम्’ व क्रीडा ध्वज सुपुर्द करून करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg