loader
Breaking News
Breaking News
Foto

आय.सी.एस. च्या अब्दुल करीम मुकादम ची उत्कृष्ट राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून निवड

खेड - येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अब्दुल करीम अली मुकादम याची करियर कट्टा उपक्रमांतर्गत उत्कृष्ट राज्यस्तरीय करियर संसद पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करियर कट्टा या उपक्रमांतर्गत राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये करिअर संसदेची स्थापना करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या पुस्तक वाचन, स्क्रीन वेळ कमी, व्यायाम इ.कामगिरीचा विचार करून पाच उत्कृष्ट राज्यस्तरीय करियर संसद पदाधिकाऱ्यांची नुकतीच सखोल परीक्षणांती निवड जाहीर करण्यात आली. यात आय.सी.एस. महाविद्यालयातील टी. वाय.बी कॉम च्या अब्दुल करीम अली मुकादम याची निवड झाली आहे. त्याबद्दल महाविद्यालयात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र माहिती सहाय्यक केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

मुकादम अब्दुल करीम याची ही निवड त्याच्या मेहनतीचे व गुणवत्तेचे फलित असून, यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन ॲड. आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच करियर कट्टा च्या रत्नागिरी प्राचार्य प्रवर्तक प्रो. डॉ. अनिता आवटी, समन्वयक प्रा. डॉ. चंद्रशेखर साळुंखे सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व सहाध्यायी विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg