loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री संत गोरा कुंभार हितवर्धक मंडळाच्या वतीने, जालगाव ग्रामपंचायत हॉल, दापोली येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

खेड - श्री संत गोरा कुंभार हितवर्धक मंडळाच्या वतीने, दिनांक २२ डिसेंबर २०२६ रोजी , जालगाव ग्रामपंचायत हॉल, दापोली येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा २०२६ रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष तसेच दापोली तालुका कुंभार समाज अध्यक्ष आदरणीय मिलिंदशेठ इवलेकर याच्या अध्यक्षेखाली दापोली तालुक्यात प्रथमच मोठ्या दीमागदाराने संपन्न झाले. समाजोपयोगी उपक्रमांची माहिती आणि वर्षभराच्या नियोजनाचा आरसा असलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन हे संस्थेच्या कार्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याच वेळी उदघाटक म्हणून संस्थापक अध्यक्ष ज्ञानदीप विद्या मंदिर खेडचे अरविंद तोडकरी, रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, दापोली तालुकाध्यक्ष मिलिंद इवलेकर, जिल्हाध्यक्षपदी श्री संत गोरो कुंभार युवा प्रतिष्ठान रत्नागिरी महेश पडवेकर, रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी जनार्दन मालवणकर, रत्नागिरी जिल्हा संघटक यशवंत (नाना) पालकर दापोली तालुक्यातील पदाधिकारी, सचिव प्रमोद निवळकर, उपसचिव नरेश दाभोळकर, खजिनदार संतोष खेडेकर, उपखजिनदार प्रकाश गुंणदेकर, श्याम लांजेकर, प्रमोद खेडेकर, विशाल लांजेकर, प्रभाकर बुरबाडकर, महेश लांजेकर, जगदिश पड़वेकर, महेश वि.पादड, जितेंद्र पडवेकर, मंगेश पालशेतकर, अनंत जालगावकर, दिपक परबलकर, शिवाजी निवळकर, विलास कलमकर, दत्ताराम येलमकर, लिलाचंद निवळकर, अनंत वारेकर समस्त दापोली तालुका कुंभार समाज बांधव उपस्थित होते. सोहळ्यास सूत्रसंचालन सचिव प्रमोद निवळकर यांनी खुप चांगल्या रित्या पार पाडले. प्रकाशन सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg