loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवली गावठणवाडी ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा

खेड(प्रतिनिधी) - खेड तसलुक्यातील वरवली गावठणवाडी ग्रामस्थांनी बांधला वनराई बंधारा. उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय व दैनंदिन वापरासाठी मुबलक पाणी मिळावे त्याचप्रमाणे वाडीत असलेल्या विहिरीची पाणी पातळी वाढावी यासाठी वरवली गावठण वाडीतील सर्व ग्रामस्थांनी मिळून रांजण डोहावर वनराई बंधारा बांधला. यासाठी वरवली गावठण वाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ व तरुण वर्गाने गेली अनेक दिवस श्रमदान करून बंधारा उभारण्यासाठी योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनाने ज्या ठिकाणी पावसाळ्याच्या पाण्याचे साठे उपलब्ध आहेत, अशा नदी नाले या ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यासाठी आवाहन केले आहे. वरवली गावठाण वाडीतील ग्रामस्थांनी स्वतः वनराई बंधारा बांधण्याचे ठरवून तो पूर्ण करून पाणीटंचाईवर मात केली आहे. त्यामुळे वरवली गावठणवाडीतील ग्रामस्थांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg