loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडियम हायस्कूल व डॉ. एम. आर. शिंगे ज्युनियर कॉलेज या प्रशालेत वीर बाल दिवस साजरा

खेड - लवेल (खेड) येथील ज्ञान विकास विद्यामंदिर इंग्लिश मिडियम हायस्कूल व डॉ. एम. आर. शिंगे ज्युनियर कॉलेज या प्रशालेत २६ डिसेंबर हा वीर बाल दिवस साजरा केला. या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये देशासाठी शौर्य वृत्तीचा अंतर्भाव व्हायला हवा त्यासाठी कथाकथन, व्याख्यान, ड्रॉईंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभात फेरी काढली,अशा विविध स्पर्धेचे आयोजन केले. यानिमित्त प्रशालेतील प्राचार्य पवार एच्.एम.यांनी एक निष्ठावान देशभक्त गुरु गोविंदसिंग यांच्या मुलांचं कर्तृत्व, तसेच मोगलांनी त्यांच्या मर्जीनुसार वागले नाहीत म्हणून त्यांच्या मुलांना साहेबजितसिंग व इतर भावंडांना भिंतीमध्ये गाडुण कसे मारले या बद्दल माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष मोहन गेजगे, प्रशालेचे चेअरमन तथा सी.ई.ओ. डॉ. मधुकर शिंगे, व्हाइस चेअरमन ॠषिकेश शिंगे, सल्लागार के. जी. राजे, कार्याध्यक्ष विठ्ठल गमरे, उपाध्यक्ष अनंत पालकर, गंगाराम गोठल, विष्णू गुंणदेकर, दीपक वामणे, खजिनदार उर्मिला आंब्रे, सरचिटणीस शोभा शिंगे, फातिमा घारे, सेक्रेटरी प्रमोद गावडे तसेच संस्थेचे पदाधिकारी कृष्णा गमरे, प्रीती गावडे, तेजस्विनी शिंगे, सिराज नाकाडे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी वीर बाल दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या साठी सुत्रसंचलन कडव मॅडम यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg