loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगराध्यक्षा माधवी बुटाला उद्या स्वीकारणार पदभार

खेड(प्रतिनिधी) - खेड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीने महाविकास आघाडीला पराभूत करत २१-० ने नेस्तनाबूत केले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या माधवी बुटालाही सर्वाधिक मताधिक्क्यांनी विजयी झाल्या. नगर परिषदेची सुभेदारी मिळवलेल्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला २९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारणार आहेत. या दरम्यान स्वागतासाठी कार्यकर्त्यांसह हितचिंतकांची गर्दी उसळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगर परिषद निवडणुकीत शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा वरचष्मा कायम राहिला. शिवसेनेला १७, तर भाजपला ३ जागा पदरात पडल्या. महाविकास आघाडीला महायुतीने पराभवाची धूळ चारत आसमानच दाखवले. शिवसेना-भाजप महायुतीच्या विजयाने राज्यात राजकीय पटलावर शिवसेना नेते रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवा विक्रम प्रस्थापित करण्याची किमया केली आहे. शिवसेनेचे पहिले तालुकाप्रमुख स्व. सुधाकर बुटाला यांच्या स्नुषा माधवी बुटाला यांनी ५,३०६ मताधिक्य घेत महाविकास आघाडीच्या सपना कानडे यांना पराभूत केले.

टाईम्स स्पेशल

या विजयानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नगर परिषदेत माधवी बुटाला यांची २९ डिसेंबर रोजी अधिकृतपणे 'एन्ट्री' होणार असून तमाम कार्यकर्त्यांच्या साक्षीने पदभार स्वीकारणार आहेत. यानंतर रितसर कारभारालाही त्या सुरूवात करणार आहेत. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहर प्रमुख कुंदन सातपुते, निवडणूक प्रमुख संजय मोदी, मिनार चिखले यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg