मालवण (प्रतिनिधी) - मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता होऊन श्री गणेश मूर्तीची ढोल ताशांच्या गजरात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक सादर करण्यात आलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित चलचित्र देखावा सर्वांचे आकर्षण ठरला. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गणेश चतुर्थीला श्री गणेशाची मूर्ती विराजमान झाली होती. या गणेशोत्सवानिमित्त दत्त मंदिरात विविध मंडळाची व बुवांची सुस्वर भजने, कीर्तने, शंकर मंदिर महिला मंडळाचा रंगमेळा कार्यक्रम, फुगड्या, वारकरी दिंडी नृत्य, कीर्तन पंचक, सत्यनारायण महापूजा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. काल या उत्सवाची सांगता होऊन सायंकाळी श्री गणेश मूर्तीची पालखी द्वारे भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक पार पडून बंदर जेटी किनाऱ्यावर श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वर महाराज व चांगदेव महाराज यांच्या भेटीचा चलचित्र सादर झाले. उत्तम देखावा, चलचित्र ट्रिक व आणि कलाकारांचे उत्तम सादरीकरण यामुळे हे चालचित्र सर्वांच्या पसंतीस उतरले. या चलचित्रा साठी लेखन - महेश धामापूरकर, दिग्दर्शन - राजेंद्र कदम,चलचित्र ट्रिक - सुमुख आर्ट्स मालवण,चलचित्र सजावट - विवेक देऊलकर, प्रमोद मेस्त्री, पार्थ मेस्त्री, संतोष मेस्त्री, अजित मेस्त्री, सर्वेश परुळेकर, प्रकाशयोजना - सचिन आरोलकर, सुयोग ढोलम, बबन मयेकर, रंगभूषा आणि वेशभूषा - तारक कांबळी, पार्श्वसंगीत - गौरीश काजरेकर, ध्वनीसंयोजन - अभय कदम, भूमिका आणि कलावंत- ज्ञानदेव - विलास देऊलकर, निवृत्ती - दिलीप हिंदळेकर, सोपान - कृष्णा खानोलकर, मुक्ताई - सेजल मांजरेकर, चांगदेव - प्रवीण पराडकर, गण - संतोष मंडलिक व भार्गव वरक, नृत्य कलाकार - चेतन हडकर, सागर रेडकर, सिद्धेश पालव, सुमेध जाधव, यशश्री वरक, गौतमी कांदळकर, श्रुतिका पाटकर, काव्या सरकारे, विशेष सहाय्य - सुधीर गोसावी, संतोष माणगांवकर, पराग परब, आबा मालवणकर, संजय परुळेकर, समीर वायगंणकर, उमेश हडीकर, दर्शन गावकर, प्रथमेश सामंत, कौस्तुभ गावकर, अमित मांजरेकर, बाळा वस्त, मंदार तांडेल, श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळ भरड मालवण यांचे सहकार्य लाभले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.