loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत

रत्नागिरी (जमीर खलफे) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या (रत्नागिरी, राजापूर-लांजा व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा) युवासेना जिल्हा युवा अधिकारीपदी प्रसाद सावंत यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली अनेक वर्षे रत्नागिरीत प्रामाणिक आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून परिचित असलेल्या प्रसाद सावंत यांनी या आधी युवासेना तालुका प्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. युवासेनेच्या सुरुवातीच्या फळीत आणि आता संघटनेच्या पडत्या काळात अशी दोन वेळा तालुका अधिकारी पदाची धुरा यशस्वी सांभाळली.

टाईम्स स्पेशल

सध्या ते रत्नागिरी शहर संघटक म्हणून जबाबदारी सांभाळत असून, युवासेना जिल्हा युवा अधिकारी ही जबाबदारी संघटनेकडून त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनेने दिलेली जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू, असा विश्वास प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला. दरम्यान, अजुन एका डॅशिंग नेतृत्वाला संघटनेकडून संधी मिळाल्याने शिवसेनेमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले असून, युवा वर्गात प्रसाद सावंत यांचे नेतृत्त्व प्रचंड लोकप्रिय असल्याने याचा फायदा पक्षाला नक्कीच होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg