loader
Breaking News
Breaking News
Foto

“ दिवाळीचा उजेड आदिवासी वस्तीत — इनर वॉइस फाउंडेशनचा ‘मनस्पर्शी’ उपक्रम !”

ठाणे (प्रतिनिधी) - दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि आपुलकीचा सण... पण अजूनही काही कोपऱ्यांत असा अंधार आहे, जिथं ना नवीन कपडे मिळतात, ना फराळाचा सुगंध पोहोचतो. अशाच डहाणू तालुक्यातील तवा परिसरातील १०५ आदिवासी कुटुंबांच्या जीवनात दिवाळीचा उजेड आणण्याचं सुंदर कार्य ‘इनर वॉइस सोशल वेलफेयर फाउंडेशनने केलं आहे. फाउंडेशनच्या सभासदांनी या उपक्रमांतर्गत प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्य, नवीन कपडे आणि दिवाळी फराळ देण्यात आला. छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि महिलांच्या डोळ्यात उमटलेले कृतज्ञतेचे अश्रू... त्या क्षणी सणाचा खरा अर्थ काय असतो हे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अनुभवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फाउंडेशनने केवळ अन्नदानच केलं नाही, तर जिल्हा परिषद शाळा, झाटेपाडा येथील विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्य, शालेय बॅगा आणि क्रीडा साहित्यही भेट दिली. मुलांच्या हातात जेव्हा नवीन बॅगा गेल्या, तेव्हा त्यांचे डोळे चमकले... आणि प्रत्येकाला जाणवलं “हो, आमच्याही घरी दिवाळी आली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. मुलांना लाडू आणि फराळ वाटण्यात आले. घराघरांत दिवे पेटले, आणि अनेकांच्या मनात आशेचा प्रकाश उजळला आल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष सुयोग कारंडे यांनी सांगितले. या उपक्रमात इनर वॉइस फाउंडेशनचे अध्यक्ष सुयोग कारंडे, खजिनदार निलेश शिंदे, उपाध्यक्ष व्ही. एन. घनवट, तसेच अमित सी., मुकुल सालुंखे, प्रकाश रोकडे, रवी बाविस्कर, रोहित केनी, अजिंक्य प्रभु, गणेश हिंगे, युसूफ हुसैन, एस. बी. बाविस्कर, डी. के. श्रीवास्तव, यशवंत केकरे, प्रज्ञा ठोसर, साक्षी शिंगाटे, सुजाता कारंडे, अंकिता रोकडे, मयुरी तांडेल आदी सदस्यांनी उपस्थित राहून दिवाळीच्या या आनंदात आपला सहभाग नोंदवला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg