loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर पंचायत समितीच्या १२ गणातील निवडणुकीची आरक्षण सोडत

वाटूळ (प्रकाश वळंजू) : आगामी होणाऱ्या राजापूर पंचायत समितीच्या गणावाईज निवडणुकीची आरक्षण सोडत आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी राजापूर येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये डॉ. ज्यास्मिन मॅडम, मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, राजापूर, तहसीलदार श्री.विकास गंबरे, यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी शाळेतील एका लहान मुलीच्या हस्ते आरक्षण सोडतच्या चिट्या काढण्यात आल्या. पंचायत गणाचे पडलेले आरक्षण पुढील प्रमाणे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अ.क्र. गणाचा क्रमांक - गणाचे नाव - आरक्षणाचप्रवर्ग १) १०१ -वडदहसोळ - सर्वसाधारण अनारक्षित २) १०२- रायपाटण - सर्वसाधारण अनारक्षित ३) १०३ - तळवडे. - सर्वसाधारण महिला ४) १०४ - ताम्हाणे - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ५) १०५ - केळवली. - सर्वसाधारण महिला ६) १०६ - जुवाठी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. ७) १०७ - धोपेश्वर -सर्वसाधारण अनारक्षित ८) १०८ - पेंडखळे - सर्वसाधारण अनारक्षित ९) १०९ - नाटे. - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला. १०) ११०- साखरी नाटे - सर्वसाधारण महिला ११) १११- अणसुरे - सर्वसाधारण महिला १२) ११२- कातळी - सर्वसाधारण अनारक्षित

टाइम्स स्पेशल

यावेळी गटविकास अधिकारी श्री.जाधव, निवासी नायब तहसीलदार श्री. सरपरे, सौ. गुरव मॅडम, महसूल नायब तहसीलदार, श्री.पाटील, सहाय्यक महसूल अधिकारी, श्री. मंगेश परांजपे, सहाय्यक कोषाधिकारी व सहाय्यक महसूल अधिकारी, श्री कुंभार, सहाय्यक महसूल अधिकारी, श्री. पिटलेकर सहाय्यक महसूल अधिकारी, राजकीय पदाधिकारी अभिजीत गुरव, भाजपा उपजिल्हाध्यक्ष, श्री. ऍड. एकनाथ मोंडे, श्री. वारीशे, दीपक नागले, प्रसाद मोहरकर, कमलाकर कदम, तालुकाध्यक्ष उद्धव ठाकरे गट, अभिजीत तेली,नरेश पुजारी, योगेश नकाशे, महेश नकाशे, प्रकाश कुवळेकर, नरेंद्र दुधवडकर उमेश पराडकर, मंदार सप्रे इत्यादी पदाधिकारी, व प्रांताधिकारी कार्यालय, राजापूर तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg