loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर

मंडणगड ( प्रतिनिधी ) --: मंडणगड पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. मारूती बोरकर, रत्नागिरीचे उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) रत्नागिरी यांच्या देखरेखीखाली मंडणगड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक ११ वाजता मंडणगड तहसीलदार अक्षय ढाकणे यांनी मंडणगड पंचायत समितीच्या ४ गणांच्या आरक्षणाची सोडत काढली. यामध्ये १) इस्लामपूर पंचायत समिती गणात (सर्व साधारण स्त्री), २) भिंगळोली पंचायत समिती गणात (सर्वसाधारण), ३) बाणकोट पंचायत समिती गणात (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), आणि ४) तुळशी पंचायत समिती गणात (सर्वसाधारण स्त्री) अशाप्रकारचे आरक्षण जाहीर करण्यात आले. रत्नागिरी उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या सोडतीच्या कामामध्ये तहसीलदार अक्षय ढाकणे यांना सुदर्शन खानविलकर, महसूल नायब तहसीलदार तसेच सचिन गोवळकर महसूल सहाय्यक अधिकारी यांनी मदत केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी काढण्यात आली.त्यामध्ये मंडणगड पंचायत समितीचे सभापती पद सर्व साधारण महिलेसाठी आरक्षित झाले. त्यामुळे किमान उपसभापती पद मिळेल या अपेक्षेने पंचायत समिती गणात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या मंडणगडातील अनेक इच्छूकांना पंचायत समिती गणात देखील नशीबाने साथ दिली नाही. त्यामुळे पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या इच्छूकांचा चांगलाच हिरमोड झाला.

टाईम्स स्पेशल

पंचायत समितीच्या गणातील आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची तारीख आधिच जाहीर झाली होती. त्यात सभापती पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने सोमवारी मंडणगड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात काढण्यात आलेल्या सोडतीच्या कार्यक्रमाला महिलांनी मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले. सोडतीच्या कार्यक्रमाकडे चुकून देखील एकही महीला फिरकली नाही. तसेच पुरुष वर्गाची देखील उपस्थिती नगण्य होती. त्यामुळे बहुतेक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg