loader
Breaking News
Breaking News
Foto

माईंडकेअर हॉस्पिटलचे १२ वर्ष पूर्ण; त्यानिम्मिताने ‘REMOVE STIGMA CAMPAIGN’ अंतर्गत राज्यव्यापी स्पर्धा व उपक्रम

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त माईंडकेअर हॉस्पिटलने आपला १२ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. त्यानिम्मिताने “REMOVE STIGMA CAMPAIGN” हा दोन महिने चालणारा अभियान प्रारंभ केला आहे. मानसिक आजारांवरील कलंक दूर करण्यासाठी आणि समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी या मोहिमेअंतर्गत विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले जाणार आहेत. या अभियानांतर्गत Youth Ambassadors Against Stigma ही विशेष कार्यशाळा शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केली जाणार असून, Stigma-Free Day निमित्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि मुक्त प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन केले जाईल. तसेच Workplace Mental Wellbeing कार्यक्रमांद्वारे ताण, व्यसन आणि डिजिटल डिटॉक्स या विषयांवर जनजागृती केली जाईल. Media Series व Community Helpline Camps द्वारे सर्व वयोगटांसाठी मानसिक आरोग्यविषयक मार्गदर्शन पोहोचवले जाणार आहे. “I Support Mental Health” सेल्फी पॉईंट आणि Wall of Hope या उपक्रमांद्वारे नागरिकांना या मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होता येईल. याचबरोबर राज्यस्तरीय ऑनलाइन व ऑफलाइन स्पर्धांची घोषणाही करण्यात आली आहे. Poster Making, Essay Writing, Short Film/Street Play आणि Reel/Elocution अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डान्स स्पर्धा तसेच मिस, मास्टर, मिस्टर आणि मिसेस अशा चार गटात माईंडस्पार्क – माईंड केअर आयकॉन या ऑफलाइन स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ 28 डिसेंबर रोजी होणार आहे. स्पर्धा दोन गटांत — शालेय (इ.५वी ते १०वी) व ओपन गट (११वी पुढे/सर्वांसाठी) — घेण्यात येणार आहेत. त्यासाठी मराठी, हिंदी आणि English पैकी कुठल्याही भाषेचा वापर करता येऊ शकतो. स्पर्धांचे विषय आहेत — मानसिक आरोग्यावरील कलंक हटवा, उपचार नव्हे ही तर अंधश्रद्धा, Mental Hygiene, मनोविकास / Self Development, Addiction आणि Suicide. प्रत्येक गटासाठी Cash + Book + Certificate + Trophy अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून शाळा व महाविद्यालयांसाठी General Championship Trophy देखील देण्यात येईल. या स्पर्धा रत्नागिरी तसेच राष्ट्रीय स्तरावर आयोजित केल्या जाणार आहेत.

टाईम्स स्पेशल

माईंडकेअर हॉस्पिटलने गेल्या १२ वर्षांत शेकडो जनजागृती कार्यक्रम, लेखमाला आणि मानसिक आरोग्य मोहिमा राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल हॉस्पिटलला Pride of Bharat 2024 – Most Trusted Psychiatrist & Sexologist (Maharashtra) आणि Emerging SME Award 2023 (Healthcare) यांसारखे राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेच्या नोंदणीसाठी WhatsApp: 8308784477 / 9503421124 वर संपर्क साधावा. माईंडकेअर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. अतुल ढगे यांनी या प्रसंगी सांगितले की, “समाजातील प्रत्येक व्यक्तीने मानसिक आरोग्याविषयी बोलले पाहिजे, हेच आमच्या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. कलंक हटवला की उपचार स्वीकारले जातात आणि तेव्हाच खरी आजारमुक्तीची प्रक्रिया सुरू होते.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg