loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत गांजा विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका इसमावर सावंतवाडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली आहे. जावेद पीरसाब शेख, रा. मोरडोंगरी असे आरोपीचे नाव आहे. ​पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, जावेद शेख हा मोरडोंगरी येथील आपल्या घराच्या अंगणात पाण्याच्या टाकीजवळ सायंकाळी ६ च्या सुमारास गांजा विक्रीसाठी थांबलेला होता. माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, हवालदार वालावलकर, राऊत, शिंगाडे यांच्या पथकाने सापळा रचला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​पथकाने आरोपीच्या घराच्या परिसर आणि घराची झडती घेतली असता, त्याच्याजवळ साधारण ३० ते ४० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावंतवाडी परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg