मुंबई - महाविकास आघाडी, मनसे (MNS) आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने 15 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. निवडणूक आयोग सरकारची कठपुतली बनवून काम न करण्याचा सल्लाही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. मतदार याद्यांतील गोंधळ दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी (Local Body Election) आधीच निवडणूक आयोगाविरोधात विरोधक एकत्र आले आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि इतर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने 15 ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. निवडणूक प्रक्रियेत असलेल्या त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
निवडणूक आयोग सरकारची कठपुतली बनवून काम न करण्याचा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मागील सर्व निवडणुका रद्द करण्याची मागणी माविआच्या नेत्यांनी केली आहे. या बैठकीत प्रथमच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच टेबलावर आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे केवळ राजकीयच नाही तर प्रशासकीय वर्तुळातही या चर्चा सुरू झाली आहे. बैठकीत विरोधकांनी आयोगासमोर खालील प्रमुख मुद्दे मांडले! 1. मतदार यादीतील घोळ:- अनेक ठिकाणी दुबार नावे, मृत मतदारांची नावे अद्याप यादीत कायम असल्याचे निदर्शनास आले. नवीन मतदारांची नावे मात्र समाविष्ट झालेली नाहीत. 2. दुबार मतदानाचा धोका:- निवडणुकीच्या पारदर्शकतेला धक्का बसू शकतो, म्हणून अशा नावांचे त्वरित पुनरावलोकन करण्याची मागणी. 3. इव्हीएम यंत्रणेबाबत पारदर्शकता:- मतदान प्रक्रियेतील इव्हीएमच्या वापरात संपूर्ण पारदर्शकता ठेवावी आणि प्रत्येक उमेदवाराला मशीन तपासण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. 4. ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट धोरण:- आरक्षण रचना आणि मतदारसंघांचे आरक्षण याबाबत आयोगाकडून स्पष्टता मागण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी आयोगावर थेट टीका करत म्हटलं की “लोकशाहीत पारदर्शक निवडणूक प्रक्रिया हीच विश्वासाची पायरी आहे. मतदार याद्यांतील गोंधळ दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नका.” राज ठाकरे यांनीही आयोगाकडे थेट मागणी केली की, “प्रत्येक मतदाराची ओळख पडताळणी योग्य पद्धतीने व्हावी. नागरिकांचा विश्वास डळमळीत झाला आहे, तो पुन्हा प्रस्थापित करायला हवा.” जयंत पाटील (राष्ट्रवादी शरद पवार) यांनी आकडेवारीसह दाखले देत सांगितले की, अनेक मतदारसंघात 10 ते 15 टक्के नावे चुकीची नोंदली गेली आहेत. विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडून निवडणुकीवर प्रभाव टाकल्याचा आरोप करत आयोगाने सर्व राजकीय दबावांना न जुमानता काम करावे, अशी मागणी केली. रईस शेख (AIMIM) यांनी अल्पसंख्याक मतदारांच्या यादीत गोंधळ असल्याचे निदर्शनास आणले. अजित नवले (शेतकरी संघटना) यांनी ग्रामीण भागात मतदान केंद्रांच्या सुविधांवर भर देण्याची मागणी केली आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.