loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसेवाने जपली हस्तलेखनाची प्राचीन पंरपरा!

रत्नागिरी : भारतीय संस्कृतीत हस्तलेखनाची परंपरा खूप प्राचीन आहे. आज टॅब, कॉम्पुटर ते अगदी व्हाईस टायपिंग आले. या साधनांमुळेे हस्तलेखन मागे पडते की काय अशी परिस्थिती शाळा-महाविद्यालयातूनही निर्माण झाली आहे. अशावेळी हस्तलेखनाची प्राचीन परंपरा जोपासावी, ती जोपासताना नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयातर्फे गेली 25 वर्षे ‘शब्दांकुर’ हे हस्तलिखित काढण्यात येत आहे. दिपोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येणार्‍या या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जनसेवा ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर यांच्याहस्ते शब्दांकुर-25 चे प्रकाशन झाले. आजपर्यंत 25 हस्तलिखिते जनसेवाने दिपोत्सवानिमित्त काढली. यानिमित्ताने रत्नागिरीतील अनेक नवोदित लेखकांना, जनसेवाच्या वाचकांना लिहते करण्याचा प्रयत्न शब्दांकुरच्या संपादक मंडळाने केला. कथा विशेषांक, बोलीभाषा विशेषांक, जन्मशताब्दी विशेषांक असे विशेषांकही काढले. हस्तलिखित काढताना सारे काही स्वहस्ते करायचे, त्यामुळे लिहणे-चित्रे रंगविणे यांपासून सारी कामे ही हातानेच करण्यात येतात. यासाठी गणेशोत्सवाआधी शब्दांकुरचे लेखन सुरू करावे लागते. यावर्षीच्या शब्दांकुरचे संपादन अमोल पालये यांनी केले आहे. जनसेवाच्या कर्मचारी सुजाता कोळंबेकर या गेली 25 वर्षे या हस्तलिखिताचे एकटाकी लेखन करत आहेत. यावर्षीचाही शब्दांकुर त्यांनी अतिशय निगुतीने लिहून काढला आहे. जनसेवा हा एक वटवृक्ष आहे, असे कल्पून त्यावर वाचकांच्या प्रतिभेची शब्दाक्षरे उमलली आहे, असे दर्शविणारे सुरेख मुखपृष्ठ यंदाच्या शब्दांकुरसाठी सौ.छाया माईण-पालये यांनी साकारले आहे. तर अविष्कारच्या शाळेतील विशेष मुलांनी यावर्षीच्या शब्दांकुरमध्ये रंगचित्रे काढली आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg