loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग विविध विकास सोसायटीवतीने तरुणांना रिक्षा वितरण

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग येथील विविध सहकारी सोसायटी सर्व सामान्य तरूण त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे यासाठी कर्ज रूपाने सहकार्य करताना दिसत आहे. या संस्थेने दोडामार्ग शहरातील काही तरूणांना सोमवारी तीन चाकी रिक्षा वितरण केल्या संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत चाव्या प्रदान करण्यात आल्या. संस्था अध्यक्ष सूचन कोरगांवकर चांगले उपक्रम राबवत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा प्रकारे रिक्षा वितरण करणे पहिला प्रयत्न आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग विविध कार्यकारी सोसायटी ही ग्रामीण भागासाठी कार्यरत आहे. अनेक उपक्रम राबवत आहे. काही सुशिक्षित तरुणांना नवीन दिशा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संस्थेच्या वतीने सोमवारी तीन जणांना सीएनएन जी तीन सीटर परमिट रिक्षा चाव्या वितरण करण्यात आल्या. यावेळी या कार्यक्रमास सहाय्यक निबंधक कार्यालय दोडामार्ग मधील सौ. पल्लवी, दोडामार्ग संस्थेचे अध्यक्ष सूचन कोरगावकर, उपाध्यक्षक अनिल सांबारी, संचालक पांडुरंग बोर्डेकर, साबाजी मोरजकर, विलास आसोलकर, आनंद म्हाडगुत, नितीन पालकर, दिलीप मयेकर, नाना बोर्डेकर, सुरेश जाधव, रेश्मा कोरगावकर, मनीषा चव्हाण, संदीप गवस, ओकार फाटक संस्थेचे कर्मचारी आश्विनी सावंत, स्वरा नाईक, पिग्मी एजट गुरुप्रसाद गावडे, तसेच संस्थेचे सभासद उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg