चिपळूण (वार्ताहर) :- चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा ३२ वा वर्धापनदिन व दुग्ध उत्पादक व प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता चिपळूण बहादूरशेखनाका येथील संस्थेच्या सहकार भवन सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची १९ ऑक्टोबर १९९३ रोजी झाली असून संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र आहे. संस्थेची सप्टेंबर २०२५ अखेर सभासद संख्या १ लाख ४५ हजार १०१, भाग भांडवल ७८ कोटी ७९ लाख रुपये, स्वनिधी १७७ कोटी ५७ लाख, ठेवी १ हजार १८२ कोटी, कर्जे १ हजार १७ कोटी, पैकी प्लेज लोन ४०२ कोटी ९८ लाख, सोने कर्ज ३४८ कोटी ३० लाख, गुंतवणुका ३०० कोटी ७६ लाख रुपये, मालमत्ता ४० कोटी ५१ लाख, नफा मार्च अखेर २१ कोटी २ लाख रुपये, एकूण शाखा ५० असून या शाखांच्या माध्यमातून हा आर्थिक कारभार सुरू आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाखांचे जाळे रोवलेल्या राज्यातील प्रसिद्ध चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने ‘आपली माणसे ! आपली संस्था’ या ब्रिदवाक्या प्रमाणे नेहमीच ग्राहकांचे हित जोपासले आहे. यामध्ये सभासदांना बचतीची सवय लागावी, यासाठी अनेक योजना चिपळूण नागरीने सुरू केल्या आहेत. यामध्ये गेल्या ३३ वर्षांच्या कालखंडात श्रावणमास, धनलक्ष्मी, संकल्प ठेव, श्री गणेश ठेव, उत्कर्ष ठेव, धनसिद्धी ठेव, श्री स्वामी समर्थ ठेव, सिद्धी ठेव व धनसंचय ठेव, राष्ट्र अमृतमहोत्सव ठेव, संकल्प ठेव या ठेव योजनेबरोबरच सुयश, अल्पमुदत, आवर्त बचत, स्वावलंबी बचत, धनवर्धिनी, दामदुप्पट, दामतिप्पट या ठेव योजनांचा समावेश आहे. या योजनेत हजारो सभासद सहभागी झाले आहेत. गेल्या ३२ वर्षांत ही संस्था सर्वसामान्यांची आधारवड बनली आहे. आता या संस्थेचा ३२ वा वर्धापन दिन बुधवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार असून या निमित्ताने दुग्ध उत्पादक प्रगतशील शेतकरी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून माजी सहनिबंधक लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य पुणे - तानाजी कवडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तर सायंकाळी ४ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात चिपळूण नागरी परिवाराचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संचालक मंडळ व चिपळूण नागरी परिवाराने केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.