loader
Breaking News
Breaking News
Foto

आडवली नं. 1 शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविले आयुर्वेदिक 'निर्मल उटणे'

मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यवसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नं 1 शाळा विविध उपक्रम राबाविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उटणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ अरुण लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. हे उटणे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविले असून चंदन, मुलातांनी माती, आंबेहळद, गुलाब पाकळ्या पावडर अशा विविध घटकांच्या वापरांतून बनविले आहे. विशेष म्हणजे निर्माल्य असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्या पासून पावडर बनविली आहे. निर्मल उटणे असे नामकरण करण्यात आले असून स्थानिक बाजारपेठेत याची विक्री केली जाणार आहे. यांतून मिळणारा नफा विद्यार्थी वेलफेअर फंडात जमा करून त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक रामचंद्र कुबल, तनुजा तांबे, रागिणी ठाकूर आणि वेदिका वाघाटे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कच्चा माल निर्मिती, उत्पादन, प्रिंटिंग, पॅकिंग, विक्री आणि विपणन, डिपार्टमेंट करून कार्य केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg