loader
Breaking News
Breaking News
Foto

खोपी बौध्दवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात २ गुरे जखमी, १ मयत

खेड - तालुक्यातील खोपी बौध्दवाडी येथे बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून हा बिबटया आता मानवी वस्तीतही शिरू लागला आहे. दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री 2 ते 2:30 च्या दरम्यान शेतकरी अमोल शंकर मोहिते यांच्या गुरांच्या वाड्यात बिबट्या शिरला आणि त्याने 3 गुरांवर जोरदार हल्ला चढविला, या हल्ल्यात 2 गुरे जखमी झाली अजून १ मयत झाले आहे. हि बाब दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता निदर्शनास आली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिका-यांना कळविण्यात आल्यानंतर वनविभागाने रितसर सोपस्कार करून शेतकरी अमोल शंकर मोहिते यांना नुकसानभरपाई मिळेल यादृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg