loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत वराडकर–बेलोसे महाविद्यालयाच्या मुली उपविजेत्या

दापोली (प्रतिनिधी) -: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा रत्नागिरी येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये वराडकर–बेलोसे महाविद्यालय, दापोली येथील मुलींच्या संघाने उत्कृष्ट खेळ करत उपविजेतेपद पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अत्यंत मर्यादित साधनसुविधा आणि प्रतिकूल परिस्थितीतही या मुलींनी जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर यश मिळवले. दापोली तालुकास्तरीय फेरीत विजयी ठरल्यावर या संघाने जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला आणि रत्नागिरी येथे आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला. संघाचे नेतृत्व श्रावणी सूर्यवंशी हिने कर्णधार म्हणून केले तर रोशनी बोवने हिने उपकर्णधाराची जबाबदारी निभावली. अंतिम सामन्यात श्रावणी सूर्यवंशी, साक्षी जाधव, आणि रोशनी बोवने यांनी उत्कृष्ट खेळ केला. तसेच लक्ष्मी धुर्वे, आर्या देवघरे, आणि टीम ने आपले सांघिक योगदान दिले. संघाच्या यशामागे क्रीडा शिक्षिका पुनम सावंत यांचे मोलाचे योगदान असून, क्रिकेटचे विशेष प्रशिक्षक दीपक सूर्यवंशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

त्यांच्या संयमी आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळेच या नवोदित खेळाडूंनी अल्प कालात कौशल्य विकसित करून स्पर्धेत विजयाची मोहर उमटवली. जिल्हा स्तरीय स्पर्धेत उपविजेता ठरलेल्या या संघाचा संस्थेचे सभापती धनंजय यादव, कार्यवाह डॉ. दशरथ भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत पाटील तसेच प्राध्यापक, शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आणि पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg