loader
Breaking News
Breaking News
Foto

दागिने आणि पैशासाठी विवाहितेला मानसिक छळातून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - चिपळूण खाडीमध्ये २३ सप्टेंबर रोजी आत्महत्या केलेल्या ४० वर्षीय अपेक्षा अमोल चव्हाण या विवाहितेला सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी वारंवार मानसिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या दोन महिलांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत विवाहितेच्या आईने, सुनिता सखाराम गणवे (वय ६५, रा. कांदीवली, मुंबई, मूळ रा. शिवधामापूर, संगमेश्वर) यांनी दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, एप्रिल २०२५ ते दि. २३ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा छळ झाल्याचे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये १) अमोल शंकर चव्हाण (वय ४८ वर्षे, पती), २) ६७ वर्षीय एक महिला (सासू), आणि ३) दिवा येथील एक महिला (नणंद) यांचा समावेश आहे. हे तिघेही रा. शिवधामापूर, ता. संगमेश्वर (आरोपी क्र. ३ वगळता) येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अपेक्षा चव्हाण यांनी तिच्या आईकडून (फिर्यादी) कार्यक्रमासाठी सोन्याचे दागिने आणले होते. त्यापैकी काही दागिने आरोपी क्रमांक १ (पती) याने गहाण ठेवले होते. ते दागिने सोडवण्यासाठी फिर्यादी यांनी पैसेही दिले होते. मात्र, यातील तिन्ही आरोपींनी संगनमत करून फिर्यादीने दिलेले दागिने आणि पैसे परत मागू नयेत, तसेच व्यवसायाकरिता माहेरहून पैसे घेऊन यावेत यासाठी मयत अपेक्षा चव्हाण यांना वारंवार तगादा लावून त्यांचा मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला कंटाळून मयत अपेक्षा यांनी दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी चिपळूण खाडीमध्ये जाऊन आत्महत्या केली.संगमेश्वर पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg