loader
Breaking News
Breaking News
Foto

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे निधन, तीन दिवसांचा दुखवटा

पणजी- गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे दुखःद निधन झाल्याने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने गोव्याच्या राजकिय सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकिय चळवळीतील एका कार्यकर्त्याच्या निधनाने संपूर्ण गोव्यात शोकाकूल वातावरण आहे. अनेकांच्या मदतीला धावून जाणारे भंडारी समाजातील एक प्रभावी नेते आज आपल्यात नसल्याचे दुःख जनतेला झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आज त्यांच्यावर अतिमसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गोवा राज्यातील भंडारी समाजाचे नेतृत्व करताना त्यांनी सर्वसमावेशक असे समाजकारण केले. १९९१ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारली आणि २८ महिने त्यांनी पद सक्षमपणे भूषविले. गोव्याच्या प्रगतीसाठी त्यांनी कठोर नियमावली तयार केली. १९८४ मध्ये ते प्रथम आमदार झाले आणि १९९८ पर्यंत ते आमदार म्हणून निवडून आले. ऑक्टोबर २००० मध्ये मनोहर सरकारच्या काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. २००२ च्या लोकसभापूर्वी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.तसेच २०२१ मध्ये त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. २०२२ मध्ये फोंडा येथून त्यांनी पक्षाला विजय मिळवून दिला. आणि प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. रवी नाईक हे गोव्याचे कृषी मंत्री होते. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg