loader
Breaking News
Breaking News
Foto

मच्छिमारांच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये बदल करावेत, विठ्ठल भालेकर यांची मागणी

वरवेली (गणेश किर्वे) - चालू मासेमारी हंगामामध्ये मच्छिमारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने जाहीर केलेले विशेष मदत पॅकेज मध्ये भरीव तरतूद करून नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये बदल करण्यात यावेत या मागणी संदर्भात मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांना भाजप महाराष्ट्राचे राज्य परिषद सदस्य विठ्ठल भालेकर यांनी निवेदन सादर केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरु झाला. मासेमारी हंगाम सुरु झाल्यापासूनच समुद्रामध्ये सातत्याने वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण होऊन मच्छिमारांना समुद्रात मासेमारीस न जाणे बद्दल मत्स्यव्यवसाय विभाग व अन्य संबंधित खात्याकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे १ ऑगस्टला मासेमारी सुरु होऊन सुद्धा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये समुद्रात निर्माण झालेली वादळ सदृष्य परिस्थिती व प्रचंड पडणारा पाऊस यामुळे मच्छिमारांचे मासेमारी हंगामातील जास्तीत जास्त मासे मिळण्याचा कालखंड (पिक पिरीयड) मध्ये मासेमारी न झाल्यामुळे किनारपट्टीवरील मच्छिमारांचे अतोनात नुकसान झालेले आहे. यासर्व गोष्टींचा एकत्र विचार केला असता सुमारे ३ महिने मच्छिमारांना मासेमारी विना वंचित राहावे लागले आहे. शासनाने शेतकरी, बागायतदार, पशुपक्षी पालन, मत्स्यव्यवसायिक यांना विशेष मदतीचे पॅकेज घोषित केल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद. मच्छिमारांचे ३ महिने मासेमारी विना नुकसान झाल्याचा विचार करता परिपत्रकामध्ये मच्छिमारांना देवू केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून दिल्या जाणार्‍या मदतीमध्ये नुकसानीच्या तुलनेत मच्छिमारांना या नुकसानीतून सावरण्यासाठी पुन्हा मासेमारी करण्यास ताकद मिळण्यासाठी भरीव पॅकेजची तरतूद करण्याची आवश्यकता आहे.

टाइम्स स्पेशल

परिपत्रकात नुकसानीसाठी दिलेल्या निकषामधील अंशता व पूर्ण नौकांचे झालेले नुकसान व जाळ्यांचे झालेले अंशतः व पूर्णतः नुकसानी बरोबरच मच्छिमारांना नुकसान भरपाई देताना नौकांच्या क्षमतेप्रमाणे ६ सिलेंडर इंजिन असलेल्या नौकांना, ४ सिलेंडर नौकांना, २ सिलेंडर नौकांना, १ सिलेंडर नौकांना व बिगर यांत्रिक नौका अशा विगतवारी प्रमाणे नुकसान भरपाईचे निकष ठरवावेत. तसेच मच्छिमार संस्थेचे मच्छिमार सभासद व मासे विक्रेत्या महिला सभासद यांनाही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष मदत पॅकेजमध्ये समाविष्ठ करण्यात यावे. अशा पद्धतीने नुकसान भरपाई पॅकेजचे निकष ठरविल्यास तळागाळातील सर्व मच्छिमारांपर्यंत झालेल्या नुकसानी पोटी दिल्या जाणार्‍या पॅकेजमुळे काही अंशी दिलासा मिळू शकेल. तरी उपस्थित केलेल्या मुदयांप्रमाणे नुकसान भरपाईचे निकष ठरवून पॅकेजमध्ये भरीव तरतूद करून दिल्यास सर्व स्थरातील मच्छिमारांना त्याचा लाभ मिळू शकेल. अशी विनंती सर्व मच्छिमारांच्या वतीने करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती आयुक्त मत्स्यव्यवसाय मुंबई, उपायुक्त मत्स्यव्यवसाय बांद्रा मुंबई, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांना देण्यात आल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg