loader
Breaking News
Breaking News
Foto

घरफोडीच्या मालिकांमागील एक आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

बांदा (प्रतिनिधी) : बांदा, इन्सुली, विलवडे आणि झाराप परिसरात झालेल्या घरफोडीच्या मालिकांमागील एक आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बांदा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत धीरज दिलीप गुप्ता (वय २०, रा. नॉर्थ गोवा) या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी तीन आरोपींचा समावेश असून ते अद्याप फरार आहेत. गुप्त माहितीद्वारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान अटक आरोपी धीरज गुप्ताने इन्सुली, विलवडे, बांदा आणि झाराप परिसरातील घरफोडी प्रकरणांतील सहभागाची कबुली दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले काही साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अटक आरोपीला बांदा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध पोलिसांकडून तीव्र गुप्त तपासाद्वारे सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहभागी झाले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे या गंभीर घरफोडी प्रकरणातील महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे परिसरात झालेल्या घरफोडी घटनांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काहीशी कमी झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg