loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारवाडी येथील सखाराम कुंभार हे मासे पकडण्यासाठी गेले असता पाय घसरून पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

सावंतवाडी : तळवडे – कुंभारवाडी येथील सखाराम सोनू कुंभार (वय ७०) हे मासे पकडण्यासाठी ओहोळामध्ये गेले असता पाय घसरून पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तळवडे – कुंभारवाडी येथील रहिवाशी असलेले सखाराम सोनू कुंभार हे मासे पकडण्यासाठी तळवडे परिसरातील एका ओहोळामध्ये गेले होते. मासे पकडण्याच्या प्रयत्नात असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते ओहोळाच्या पाण्यात पडले यावेळी ते पाण्यात बुडल्याने कुठेही दिसून आले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सखाराम कुंभार बराच वेळ झाला तरी घरी परतले नाहीत त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. अनेक तासांच्या शोध मोहिमेनंतर अखेर त्यांचा मृतदेह ओहोळात आढळून आला. या घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत. सखाराम कुंभार यांच्या दुर्दैवी निधनामुळे तळवडे – कुंभारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने तळवडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg