loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडलोस बालसभेत तहसीलदार बनले कवी

बांदा (प्रतिनिधी) - प्रत्येक विद्यार्थ्यांने नैसर्गिकरित्या बनलेली फळे, भाजीपाला खाऊन आरोग्य हेल्दी बनवावे. जीवनात कोणाला कधीही कमी लेखू नका. मोबाईलचा वापर चांगल्यासाठी, अभ्यासासाठी करा. असे सांगत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मुलांना गोष्टी सांगत कविता म्हणून दाखवली. पाडलोस देऊळवाडी येथे पंचायत राज संस्था आणि समुदाय आधारित संघटना अंतर्गत ओम गणेश बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्रीधर पाटील बोलत होते. यावेळी ओम गणेश बालसभेचे पदाधिकारी, श्री स्वामी समर्थ ग्रामसंघ अध्यक्ष मयुरी हरिजन, सचिव संगीता गावडे, लिपिका शीतल गावडे, सीआरपी नेहा नाईक, आशासेविका विजया गावडे, अंगणवाडी सेविका तनुजा कुबल, पालक अर्पिता गावडे, केरळ येथील मेंटर गिरीजा संतोष, उमेद प्रभागसंघ व्यवस्थापक मळेवाड प्रचिती मडुरकर, पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, माजी संचालक आनंद कुबल आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गिरीजा संतोष यांनी सांगितले की, सावंतवाडी तालुक्यात विविध गावांत एकूण 60 बालसभांची स्थापना करण्यात आली. मोबाईलवर खेळत बसण्यापेक्षा बालसभेत येऊन संस्कारांचे बाळकडू अनुभवा. मराठी, इंग्रजी माध्यमाच्या मुलांना एकत्र करत बालसभेतून एक व्यासपीठ उपलब्ध केल्याचे गिरीजा संतोष यांनी सांगितले. बालसभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एसटी बसची समस्या मांडली होती. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर आता वेळेत बससेवा चालू आहे. या कृतीचा दाखल केरळमध्ये देत पाडलोस ओम गणेश बालसभेचे केरळमध्ये मोठ्या स्क्रीनवर कौतुक करण्यात आल्याचे गिरीजा संतोष यांनी सांगितले. ओम गणेश बालसभेचे सूत्रसंचालन प्रचिती मडुरकर यांनी केले. प्रास्ताविक नेहा नाईक यांनी तर आभार शीतल गावडे यांनी मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg