loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण लायन्स क्लबकडून मेहनती महिलांचा सत्कार

मालवण (प्रतिनिधी) - ऑक्टोबर सर्व्हिस वीक आणि वर्ल्ड सर्व्हिस डे च्या निमित्ताने लायन्स क्लब मालवणच्या वतीने मेहनती दोन कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. मालवण येथील समीर शेख सर्व्हिसिंग सेंटर मध्ये गाड्या धुण्याचे काम करून आत्मसन्मानाने, स्व:कर्तृत्वाने आणि मेहनतीने जीवन जगणाऱ्या रजिया उमर शेख व तरनूम समीर शेख या सासू- सुनेचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. स्व: कष्टाने जीवन जगणाऱ्या मात्र समाजाकडून दुर्लक्षित राहिलेल्या अशा महिलांचा लायन्स क्लबने सन्मान करून सेवा म्हणजे फक्त मोठी कामगिरी नव्हे, तर मनापासून केलेला प्रयत्न आहे, असा संदेश दिल्याचे लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी यावेळी अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, ज्येष्ठ लायन सभासद शशिकांत झाटये, रुजारियो पिंटो, उमेश नेरूरकर, गणेश प्रभुलीकर, अरविंद ओटवणेकर, मेघ:शाम शंकरदास, उमेश शिरोडकर, विश्वास गावकर, मुकेश बावकर, किरण कारेकर, विराज आचरेकर, जयश्री हडकर, स्वप्नाली नेरुरकर, फॅनी फर्नांडिस, दीक्षा गावकर, राधिका मोंडकर, मनीषा गावकर, अंजली आचरेकर, नंदिनी गावकर, ज्योती राळकर, वंदना कांदळकर, सोनाली पाटकर, अपूर्वा खानोलकर, प्रज्ञा तायशेट्ये, नेहा कांदळकर, सुभाष कुमठेकर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg