चौक (अर्जुन कदम) - रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील वंडरशेफ होम अप्लायन्सेस प्रा.लि. कंपनीतील सिक्युरिटी केबीनचा दरवाजा तोडून नाईट शिफ्ट कामगारांचे १५ मोबाईल चोरून, चोरटे फरारी झाले होते, त्यांना रसायनी पोलिसांनी २४ तासात मुद्देमालासह ताब्यात घेतल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. मोबाईल चोरीची रीतसर तक्रार रसायनी पोलीस ठाण्यात देण्यात आल्यावर रसायनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक संजय बांगर हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. फिर्यादी यांच्या माहिती वरून गुन्हा रजि नं. 194/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला.सदर गुन्ह्याचे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे यांची पडताळणी केली असता तीन अनोळखी इसम हे कंपनीमध्ये प्रवेश करुन सिक्युरिटी केबीनचा दरवाजा ढकलुन आत घुसून कामगारांचे मोबाईल चोरी करीत असताना दिसून आले सदर सीसीटीव्ही कॅमे-या मधील अनोळखी इसम यांची माहिती घेतली असता सदर इसम हे ठेकेदार याच्याकडे कामास असून त्यांचे नाव मोहम्मद इकरार मोहम्मद इसराज, मोहम्मद आजम मोहम्मद शरीफ आणि रिझवान नदीम शेख असे खात्रीशीर माहिती मिळाली.
ते राहत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता, ते गावी जाण्याच्या तयारीत असून येथून पलायन केले अशी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी तात्काळ मुंबई येथे पथक रवाना केले त्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी तांत्रीक पुराव्यांच्या विश्लेषण करुन मुंबई येथे शोध घेणे करिता गेलेले पोलीस पथकास मार्गदर्शन करुन तसेच पोलीसांनी गोपनिय बातमीचा आधार घेऊन कौशल्यपुर्ण तपास मुंबई येथे केला,तीन्ही आरोपी डोंगरी मुंबई येथे असल्याची खबर मिळताच सायंकाळी सापळा रचून आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपी यांना गुन्ह्याचे तपासात अटक करण्यात आले असून त्यांनी चोरी केलेले सर्व १५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास हेमंत कोकाटे, पोलीस हवालदार, ब. नं.1168, रसायनी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
जनतेने आपल्या मौल्यवान वस्तु सुरक्षित ठेवाव्यात तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या कार्यालयाबाहेर अथवा घराबाहेर किंवा आजुबाजुच्या परिसरात शक्य असल्यास जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत. जेणे करुन पोलीसांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेण्यास मदत होईल. तसेच आपल्या सोसायटी, गावातील परिसरात संशयीत इसमांबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात अथवा डायल 112 वर संपर्क करुन माहिती द्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आँचल, अपर पोलीस अधीक्षक, रायगड, शिवथरे, विशाल नेहुल, उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली संजय बांगर पोलीस निरीक्षक, रसायनी पोलीस ठाणे, सहा. फौजदार लालासाहेब कोळेकर, पोह/745 नितीन शेडगे, पोह/1168 हेमंत कोकाटे, पोह/1098 शिवाजी पानपट्टे, पोशि/419 रविंद्र कुंभार यांनी या मोहिमेत भाग घेतला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.