loader
Breaking News
Breaking News
Foto

मैदानी क्रीडा स्पर्धेत मडुरा हायस्कूलचे घवघवीत यश

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेने यंदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा लौकिक वाढविला. १७ वर्षे मुलगे गटात मंगेश नितीन नाईक याने गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. तसेच १७ वर्षे मुली गटात क्लेरीचा जुलियस रोड्रिक्स हिनेही गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याशिवाय उर्वशी विजय शेर्लेकर हिने थाळीफेक व भालाफेक या दोन्ही स्पर्धांमध्ये तृतीय क्रमांक मिळवत आपली प्रतिभा सिद्ध केली. तसेच १४ वर्षे गटात तपस्या भरत धुरी, अलिषा रघोबा गावडे आणि देवेश गोपाळ नाईक यांनीही उत्तम कामगिरी बजावली. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक महेश नाईक व लवू बांदेकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनती व प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले.

टाईम्स स्पेशल

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व पदाधिकारी, मुख्याध्यापिका सायली परब, शालेय समिती उपाध्यक्ष निर्जरा परब, सर्व सदस्य, पालक-शिक्षक संघ, पंचक्रोशीतील सरपंच, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मडुरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या कामगिरीने शाळेचा मान आणखी उंचावला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg