loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असणा-या लांजा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महीला पडल्यानंतर अनेक ईच्छा स्वप्नांना गती आली असुन. उमेदवारी कोणाला मिळेल याकडे शहरवासीयांसह इच्छुकांनाही उत्सुकता लागली आहे.नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नगरपंचायत निवडणुक संदर्भात चर्चा वाढू लागली आहे. प्रभागातही निवडणुकीच्यासंदर्भात अप्रत्यक्ष पणे प्रचारालाही वेग आला असल्याचे बोलले जात आहे. 17 पैकी 9 जागा महीला राखीव आहेत यामुळे यावेळी नगपंचायतीवर महीला राज येणार.लांजा नगरपंचायत 2012 साली गठीत झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संपदा वाघधरे या अडीच वर्षासाठी पहील्या महीला नगराध्यक्ष झाल्या त्यानंतर अडीच वर्षाकरिता शिवसेनेचे सुनिल कुरुप नगराध्यक्ष झाले. तत्कालीन झालेल्या निवडणुकीत मनोहर बाईत हे लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षातून निवडून आले. आता आगामी होणा-या निवडणुकीत महीला आरक्षण पडले असुन थेट जनतेतून मतदानाद्वारे नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे प्रभाग वाईज आरक्षण पडल्यानंतर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असुन निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांकडून उमेदवार चाचपणी सुरू केली आहे. आरक्षणामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून राहिलेल्या काहीची स्वप्न भंग झाल्याने पतिराजाकडू आपल्या पत्निला तरी नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी म्हणून आतापासूनच काहीकडून फिल्डींग लावली जात असल्याचे बोलले जात आहे. लांजा शहरासह तालुक्यात शिवसेना पक्षाचे वर्चस्व आहे. सत्ता आणि पक्षाचा आमदार असल्यामुळे सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची संख्या शिवसेना पक्षात मोठी असल्याचे समजते. माजी नगरसेवक असलेल्या महीलामधून काही महीला नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्ष पदाचे तिकीटावर डोळा ठेवून शिंदे शिवसेना गटात काहीनी प्रवेश केल्याचे बोलले जाते. तर काहीकडून आपल्यालाच तिकीट देणार असे छातीठोकपणे सांगताना दीसून येत आहेत. त्यामुळे आमदार कीरण सांमत हे नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकतात?की उच्चशिक्षित, जनमानसात चांगली प्रतिमा असणा-या एखाद्या फ्रेश चेह-याला संधी देतात याकडेच सर्वाचे अधिक लक्ष लागुन राहीले आहे. तसेच भाजपा पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याने भाजपा आणि शिवसेना पक्षातच चुरशीचे लढतीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान शिवसेना उबाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता अधिक असुन त्या पध्दतीच्या वाटाघाटी चालु असल्याचे बोलले जात आहे तसेच या निवडणुकीत डीपी प्लॅन मुळे नाराज झालेली जनतेमुळे विरोधकांकडून शहरातील डीपीप्लॅन चा विषयावर प्रचाराची यंत्रणा राबवली जाण्याची शक्यता असल्यामुळे. निवडणुक अधिक रंगतदार आणि चुरशीची होण्याची शक्यता असल्याचे काही राजकीय मंडळीतून बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg