रत्नागिरी (किशोर मोरे) : रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद विभाग निवडणुक आरक्षणाची लॉटरी आज लागली. त्यामध्ये अनेकांना लाभ तर अनेकांना तोटा झाला आहे. सदस्यपदाकडे वाट लावून बसलेल्या अनेक सदस्यांना पाच वर्षे हात चोळत बसावे लागणार आहे. अनेकांचे आरक्षण धोक्यात आले आहे. यावेळी देखील महिलांना मात्र चांगल्या पद्धतीने आरक्षणाची वाट मोकळी झाली आहे. बाणकोट, केळशी, कोकरे, आसगोली, कोतवडे, खालगांव, गोळप, पावस, कडवई, वेळणेश्वर, धामापूर तर्फे संगमेश्वर, धोपेश्वर, उमरोली, दयाळ, जालगांव या जागा लक्षवेधी ठरणार आहेत. कारण त्याठिकाणी इच्छुक उमेदवारांना संधी मिळणार आहे.
रत्नागिरी तालुका जि.प.आरक्षण वाटद- अनुसुचित जाती स्त्री, खालगाव - सर्वसाधारण, कोतवडे-सर्वसाधारण, झाडगांव म्यु.बाहेर-सर्वसाधारण स्त्री, खेडशी-सर्वसाधारण स्त्री, हातखंबा-अनुसुचित जाती, नाचणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग, कर्ला-नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोळप-सर्वसाधारण, पावस-सर्वसाधारण. तसेच चिपळूण तालुक्यातील जि.प.सदस्यांचे आरक्षण: कळबंडे-सर्वसाधारण स्त्री, पेढे-सर्वसाधारण स्त्री, खेर्डी-सर्वसाधारण स्त्री, अलोरे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, शिरगांव-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सावर्डे-सर्वसाधारण स्त्री, कोकरे-सर्वसाधारण, असगोली-सर्वसाधारण. खेड तालुक्यात सुकीवली-नागरिकांचा मागास प्रवर्ग, भरणे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, भडगांव-नागरिकांचा मागास प्रवर्ग, दयाळ-सर्वसाधारण, विराचीवाडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, लोटे-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, धामणदिवी-सर्वसाधारण स्त्री.
दापोली तालुक्यात केळशी-सर्वसाधारण, पालगड-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, हर्णे-अनुसुचित जमाती स्त्री, जालगांव-सर्वसाधारण, कोळबांद्रे-सर्वसाधारण, दाभोळ-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तर मंडणगड तालुक्यात भिंगळोली व बाणकोट-सर्वसाधारण. संगमेश्वर तालुका पातळीवर धामापूर तर्फे संगमेश्वर-सर्वसाधारण, कडवई-सर्वसाधारण, कसबा संगमेश्वर-सर्वसाधारण स्त्री, मुचरी-सर्वसाधारण स्त्री, कोसुंब-सर्वसाधारण, साडवली-सर्वसाधारण स्त्री, दाभोळे-सर्वसाधारण. लांजा तालुक्यात आसगे-सर्वसाधारण स्त्री, आसगे-भांबेड-साटवली- सर्वसाधारण स्त्री, गवाणे-सर्वसाधारण, राजापूर तालुक्यात वडदहसोळ-सर्वसाधारण, तळवडे-सर्वसाधारण स्त्री, जुवाठी-नागरिकांचा मागास प्रवर्ग, धोपेश्वर-सर्वसाधारण आणि साखरीनाटे व कातळी-सर्वसाधारण स्त्री. अशा राखीव झाल्या आहेत.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.