मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड येथील जनता दरबारात नागरीकांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करत नाम.योगेश कदम यांनी आपली निर्णय क्षमता दाखवून दिली. या त्यांच्या समाजोपयोगी सामाजिक कामाचे नागरीकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे गृह (शहरे), महसूल, ग्राम विकास व पंचायत राज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री नाम. योगेशदादा कदम यांनी आपल्या मतदारसंघातील मंडणगड तालूक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंडणगड पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृह एका जनता दरबाराचे आयोजन केले होते. मंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या या जनता दरबारात तालुक्यातील अगदी गावा-गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आपल्या प्रलंबित समस्यांचा निपटारा होईल या आशेने ते मंत्रीमहोदयांच्या भेटीला आले होते. जनता दरबारात आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकूण घेत शक्य त्या समस्यांचा निपटारा जागेवरच करण्यात मंत्रीमहोदय यशस्वी झाले त्यामुळे जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे मनोमन समाधान झाले . त्यामुळे मंडणगड येथे मंत्रीमहोदयांनी नागरिकांच्या समस्यांचा निपटारा होण्यासाठी आयोजित केलेला जनता दरबार खऱ्याअर्थाने यशस्वी ठरले.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या सार्वजनिक हिताच्या विकास योजना तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळाला पाहिजे या हेतूने बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, शिक्षण विभाग, सिंधूरत्न योजना, पशुसंवर्धन विभाग आदी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांबाबत नागरिकांना उपस्थित केलेल्या समस्या तिथल्या तेथे सोडून त्यांनी समस्या घेऊन आलेल्यांना समाधानाचा दिलासा दिला. त्यामुळे मंत्रीमहोदयांची प्रशासनावर असलेली कंमाड दिसून आली. योगेशदादा कदम यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात घेवून आलेल्या समस्यांचा झटकीपट निपटारा झाल्याने जनता दरबारात समस्या घेऊन आलेल्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव लपून राहिले नाहीत.
मंडणगड पंचायत समितीच्या राजमाता जिजाऊ सभागृहात योगेशदादा कदम यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात तहसीलदार अक्षय ढाकणे, गटविकास अधिकारी सुनील खरात, जिल्हा परिषद बांधकाम विभाग मंडणगडचे उपअभियंता अक्षय बोरसे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मंडणगडच्या उपअभियंता कविता जवादे आदी अधिकारी वर्गासह शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, उप तालुका प्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, समाजसेवक संदेश चिले, तालुका समन्वयक अनिल रटाटे, महिला समन्वयक अस्मिता केंद्रे, युवासेना उप जिल्हाधिकारी अमित पारदुले, ग्राहक संरक्षण तालूका अध्यक्ष सुजित देवकर, उमरोली विभाग प्रमुख आनंद भाटे, यूवासेना उमरोली विभाग अधिकारी बद्रुदीन उंडरे, अजहर मुकादम, प्रविण जाधव, महेंद्र पाटील, विश्वनाथ सावंत आदींसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, मंडणगड नगर पंचायतीचे नगरसेवक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.