loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त, एकावर गुन्हा दाखल

संगमेश्वर (वार्ताहर) - करजुवे येथील मार्गावर बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर संगमेश्वर पोलिसांनी कारवाई करत १६ लाख रुपये किंमतीचा डंपर जप्त केला असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डंपरमधून सुमारे दीड ब्रास वाळू वाहतूक केली जात होती. वाहनाच्या मागील बाजूस क्रमांक प्लेटही नव्हती. सदर डंपरचे चालक दिनार दिलीप पवार (वय ३८, रा. माखजन) यांच्याविरोधात संशयित आरोपी म्हणून भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी शासनाच्या निर्बंधांचे उल्लंघन करून विनापरवाना वाळूची वाहतूक केली होती, अशी फिर्याद पांडुरंग कुंडलिक शेंडगे (वय ५५, तलाठी, रा. ओझरे खुर्द, देवरुख) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करून गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. साळवी (माखजन पोलीस दूरक्षेत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg