loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहिण योजनेची रक्कम लाभार्थीच्या खात्यावर जमा करा, राष्ट्रीय काँग्रेस महिलांच्यावतीने इशारा

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सरकार वतीने संजय गांधी निराधार योजना, इतर शासकीय योजना महिलांना दिल्या जातात तसेच विधानसभा निवडणूक २०२४ दरम्यान राज्यातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना देण्याची घोषणा करून यां योजनेद्वारे बहिणींना रुपये १५०० /- रक्कम देण्यात आली. मात्र निवडणूका झाल्या आणि सत्तेत आलेल्या भाजपा - शिंदे सेना - राष्ट्रवादी अजित पवार गट यांना या बहिणीचा विसर पडला असून संजय गांधी निराधार योजना, लाडकी बहिण योजनेची रक्कम लाभार्थीच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस महिलांच्यावतीने मालवण तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा न झाल्यास वर्गणी काढून जमा झालेली रक्कम मुख्यमंत्र्यांना भाऊबीज म्हणून पाठवू असा इशाराही उपस्थितांनी दिला. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या या योजनाअंतर्गत महिलांना मिळणारा लाभ यात त्रुटी निर्माण करून शासनाने काही प्रमाणात यावर निर्बंध आणले यामुळे अनेक गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणे बंद झाले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मिळणारी रक्कम हि तुटपुंजी असली तरी गावाखेड्यातील महिलांना हि रक्कम तात्पुरती गरजेची असते. सदर रक्कम गेले वर्षभर न मिळाल्याने तसेच ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा पुरेशा नसल्याने या योजनेची माहिती महिलांना योग्य वेळेत मिळत नाही.

टाईम्स स्पेशल

यामुळे सदर महिलांना रक्कमेची चौकशी करण्याकरिता बँका तसेच तहसील कार्यालयामध्ये वारंवार यावे लागते. तरी यां महिलांना होणारा त्रास व वाया जाणारा वेळ पाहता हे परवडणारे नाही. ही रक्कम दिवाळीपूर्वीचं मिळणे गरजेचे आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी याचं आठवड्यात महिलांच्या खात्यावर जमा व्हावी असे म्हटले आहे.यावेळी ऍड. अमृता अरविंद मोंडकर, रूपाली जेम्स फर्नांडिस, शुभदा गणेश पाडगावकर, प्राची पराग माणगावकर या महिलां कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, मालवण तालुका अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, पराग माणगावकर, सारा फर्नांडिस व इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg