कणकवली (प्रतिनिधी)- कणकवली पंचायत समितीच्या सदस्य पदासाठी 16 गणांपैकी आरक्षण जाहीर करण्यात आले असून आठ जागा महिलांसाठी तर आठ जागा पुरुषांसाठी आरक्षित झाल्या आहेत. कणकवली पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रभागातील महिला राखीव झाल्याने नांदगाव आणि नाटळ पंचायत समिती गणातील महीला उमेदवार सभापती पदासाठी प्रमुख दावेदार ठरणार आहेत. कणकवली पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थित चिठ्ठयांद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली.आरक्षण सोडत काढण्याच्या प्रक्रियेवेळी नायब तहसीलदार मंगेश यादव, एम. पी. मंडले, सत्यवान माळवे व अन्य उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे कणकवली पंचायत समितीच्या सदस्यपदांसाठी येथील तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या दालनात आरक्षण सोडत काढण्यात आली. १६ गणांपैकी ८ गण महिलांसाठी राखीव झाले आहेत. महिलांसाठी राखीव झालेल्या गणांपैकी जानवली अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला आहे. या आरक्षणामुळे अनेकांचे पत्ते कट झाले असून नव्यांना संधी प्राप्त झाली आहे. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार जानवली मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. अनुसूचित जातीच्या जागेसाठी मागील पडलेले आरक्षण पाहून हा मतदारसंघ अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाला. त्यानंतर उर्वरित मतदारसंघांपैकी ना. मा.प्र.साठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कलमठ, कासार्डे, नांदगाव, नाटळ हे मतदारसंघ ना.मा.प्रसाठी राखीव झाले आहेत. ५० टक्के महिला आरक्षणानुसार ना.मा.प्र.साठी राखीव झालेल्या मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठयांद्वारे सोडत काढण्यात आली. यात नांदगाव व नाटळ हे मतदारसंघ ना.मा.प्र. महिलांसाठी राखीव झाले आहेत. उर्वरित ११ मतदारसंघांतून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात बीडवाडी, लोरे, हरकुळ बुद्रुक, ओरसगाव, नरडवे हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाले आहेत तर फोंडा-करूळ, खारेपाटण, वरवडे, हरकुळ खुर्द, तळेरे, कळसुली हे मतदारसंघ सर्वसाधारणसाठी राखीव झाले आहेत. आरक्षण सोडतीच्या चिठ्ठया विद्यामंदिरची विद्यार्थिनी देविश्री पाटील व विद्यार्थी पार्थ तेली यांनी काढल्या.
निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे नव्याने हे आरक्षण निच्छित झाले. येत्या १७ ऑक्टोंबरपर्यत आरक्षणावर हरकीत.नोंदविण्याचे आवाहन तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी केले आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत कणकवली पंचायत समितीच्या 2017 मधील जवळपास दहा माजी पंचायत समिती सदस्याना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे तर सहा उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे काही सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण तर अनेकांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.