मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडींच्या सर्व दिग्गज नेत्यांसोबत पाहून अनेकांना पडलेल्या प्रश्नांचे एकप्रकारे उत्तरच मिळाले आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे एकत्र येणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीदरम्यान ते युती करु शकतात. यापूर्वी 20 वर्षानंतर ठाकरे बंधूच्या भेटी गाठल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र आज राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात होते. त्यामुळे आता ठाकरे बंधू एकत्र आले, अशी चर्चा जोरदार रंगली आहे. मात्र, अजून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम ह्यांची मंत्रालय येथील कार्यालयात भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक याद्यांमधील घोळ तसेच मतदान प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडण्याची मागणी केली.
निवडणूक आयोगाला पत्र देताना शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, राष्ट्रवादी (SP) चे अध्यक्ष शरदचंद्र पवार, मनसेप्रमुख (MNS) राजसाहेब ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अनिल परब, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, मुंबई कॉंग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड तसेच महाविकास आघाडीतील सहयोगी पक्षांचे इतर नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.