loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापुरात पंचायत समितीचे आरक्षण जाहीर, काहींचा हिरमोड तर काही जणांना दिलासा

राजापूर (वार्ताहर) - राजापूर पंचायत समितीच्या एकूण १२ गणांच्या सोमवारी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये काहींना तारले तर काहींच्या पदरी निराशा पडली. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये ५ सर्वसाधारण, ४ सर्वसाधारण महिला, २ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला आणि १ नागरीकांचा मागास प्रवर्ग असे गण आरक्षित झाले आहेत. यावेळी राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षित झाले असून ताम्हाणे आणि नाटे हे दोन गण त्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजापूरचा पुढील सभापती या दोन गणांपैकी असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण १२ गण असून त्यामध्ये वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे, कातळी यांचा समावेश होतो. सुरूवातीला तहसिलदार विकास गंबरे यांनी आरक्षण कसे काढले जाणार याची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार लहान विद्यार्थिनीला निमंत्रित करण्यात आले होते. तिच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या आणि राजापूर पंचायत समितीच्या एकूण १२ गणांचे आरक्षण जाहिर झाले. जाहीर झालेल्या आरक्षणानुसार वडदहसोळ, रायपाटण, धोपेश्वर, पेंडखळे, कातळी हे सर्वसाधारण गण, अणसूरे, साखरीनाटे, तळवडे, केळवली हे ४ गण सर्वसाधारण महिला म्हणून जाहीर झाले तर नाटे व ताम्हाणे नागरीकांचा मागास प्रवर्ग, महिला व जुवाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग म्हणून आरक्षित झाले.

टाईम्स स्पेशल

राजापूर पंचायत समितीचे सभापतीपद हे नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला असे यापूर्वीच जाहीर झाले असून त्या प्रभागात येणार्‍या नाटे व ताम्हाणे पंचायत समिती गण राजापूरचा पुढील सभापती ठरवतील हे निश्चित झाले आहे. मनाजोगे आरक्षण पडल्याने अनेकांना नशिबाने साथ दिली तर काही ठिकाणी अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहींच्या पदरी निराशा पडली. तालुक्यातील वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, कातळी आदि पंचायत समिती गणात मोठी चुरस निर्माण झाली असून तेथे इच्छुकांची गर्दी पहावयास मिळणार आहे तर उर्वरित पंचायत समिती गणात मनाजोगे आरक्षण न पडल्याने काहींच्या पदरी निरशा आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg