loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळा व्यवस्थापन समिती वेलदूर नवानगर यांचे तर्फे समुदाय आरोग्य अधिकारी अशोक कुंभार यांचा सत्कार

वरवेली (गणेश किर्वे) - जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभेमध्ये वेलदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी अशोक कुंभार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण रोहीलकर होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शिक्षण तज्ञ सदस्य शंकर कोळथरकर, युवा नेते मनोज पावसकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, ग्रामपंचायत सदस्य प्राजक्ता जांभरकर, उपाध्यक्ष रवींद्र जांभरकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, पदवीधर शिक्षक निलेश पाटील, शिक्षक वृंद धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड, अफसाना मुल्ला, आरोग्य सेविका किल्लेकर, आशा सेविका सोनाली वनकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सदर सभेमध्ये डॉ कुंभार यांनी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय, त्याचा परिचय, सदर लसीचे उद्दिष्ट, एचपी व्ही लसीकरण याबाबत उपस्थितांना व पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी शंकर कोळथरकर, मारुती रोहीलकर, मनोज पावस्कर मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी मोरे तर आभार प्रदर्शन अफसाना मुल्ला यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg