रत्नागिरी (प्रतिनिधी)- स्वस्थ नारी सशक्त परिवार... या अर्थपूर्ण घोषवाक्याखाली भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे प्रभाग क्र. ८, रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे पोलीस सेवेत कार्यरत महिलांसाठी विशेष महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये महिलांसाठी दातांची तपासणी, गर्भाशय तपासणी, तसेच कर्करोग मार्गदर्शन अशा विविध मोफत तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. कार्यक्रमास पोलीस सेवेतील अनेक महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि त्यांनी या उपयुक्त शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक फडके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी शिबिराला भेट दिली. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, सरचिटणीस नुपुरा मुळ्ये, शहर अध्यक्षा भक्ती मनोर दळी, ओबीसी शहरअध्यक्षा सोनाली केसरकर, कामना बेग, शहर खजिनदार शोनाली आंबेरकर, सुचिता नाचणकर महिला तालुकाध्यक्ष, अनुश्री आपटे, प्रणाली रायकर, प्रज्ञा टाकळे, अनुष्का शेलार, सिया घाग, राधिका आपटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी पोलिसांकडून भाजपा महिला मोर्चा कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. पोलीस अधीक्षक बगाटे तसेच उपअधीक्षक फडके यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, महिलांच्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. आयोजक वर्षा परशुराम ढेकणे जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, कामना बेग (सचिव)भाजपा शहर, प्रशांत घाणेकर बुथ प्रमुख भाजपा, अमेय मसुरकर आदी. महिलांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे तरच घडेल स्वस्थ नारी सशक्त परिवार.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.