loader
Breaking News
Breaking News
Foto

60 नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकले अन् हाती घेतलं ‘भारताचे संविधान’!

गडचिरोली- माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वातील प्रमुख सदस्य, पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर असलेला मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने तब्बल 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. महाराष्ट्राच्या गडचिरोली पोलिसांना माओवाद विरोधातील लढाईला आजवरचे सर्वात मोठे ऐतिहासिक यश मिळाले आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वातील प्रमुख सदस्य, पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर असलेला मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने तब्बल 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण करणार असल्याची अट नक्षलवाद्यांनी टाकली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरचा दौरा सोडून तडका फडकी गडचिरोली येथे दाखल झाले. आणि त्यांच्यासमोर त्यांनी आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माहितीनुसार, ही सामूहिक शरणागती काल रात्री उशिरा दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने झाली.आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये भूपतीसह अनेक महत्त्वाचे कमांडर आणि सदस्य सामील आहेत. यामध्ये 54 हून अधिक शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत, ज्यात AK-47 आणि INSAS सारख्या रायफल्सचा समावेश आहे. गडचिरोलीच्या नक्षलवाद विरोधी इतिहासातील सर्वात मोठी शरणागती मानली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg